
मुंबई, 02 जून, (हिं.स.)। देशातील आघाडीची रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड(जीपीएल) (BSE scrip id: GODREJPROP) ने मोठ्या कराराची घोषणा केली. कंपनीने ग्रेटर नोएडा येथील निवासी भूखंडाची बिड जिंकल्याचे जाहीर केले. हा भूखंड डीएमआयसी इंटिग्रेटड टाऊनशिपमध्ये स्थित असून, तो तब्बल २३.२ एकर क्षेत्र पसरला आहे. डीएमआयसी इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाऊनशिप ग्रेटर नोएडा लिमिटेडने एका ई-लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात गोदरेज प्रॉपर्टीजने यशस्वी बाजी मारत संबंधित निवासी जागा आपल्या नावे केली. येत्या काळात या भूखंडावर निवासी गृहप्रकल्प उभारले जाईल.
गोदरेज प्रॉपर्टीज या मिळालेल्या जागेवर भव्य निवासी गृहप्रकल्प विकसित करणार आहे. या प्रकल्पात विविध आकारांचे आणि रचनेचे अत्याधुनिक निवासी घरे बांधली जातील. या संपूर्ण गृहप्रकल्पातून कंपनीला सुमारे ७ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्राहकांना जागतिक दर्ज्याच्या आधुनिक सुविधा असणारी घरे उपलब्ध करुन दिली जातील. हा प्रकल्प ग्रेटर नोएडा परिसरतील गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल.
हा भूखंड ग्रेटर नोएडा येथील डीएमआयसी इंटिग्रेटेड टाऊनशिपमध्ये मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे. हे टाऊनशिप तब्बल ७५० एकरमध्ये पसरलेले असून येथे अत्याधुनुक स्मार्ट प्लग-एण्ड-प्ले अशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. हा भाग ग्रेटर नोएडा बाजारपेठेचा मुख्य विकास कॉरिडॉर मानला जातो. या परिसराला इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवेची उत्तम कनेक्टिव्टीही आहे. यासह, जेवार येथील आगामी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळही या ठिकाणाहून जवळच उभारले जाणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजला ग्रेटर नोएडामध्ये नेहमीच मोठे यश मिळाले आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने लाँच केलेल्या दोन प्रकल्पांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्या दोन्ही प्रकल्पांमधून कंपनीने प्रत्येकी सुमारे १ हजार ५०० कोटी रुपयांची दमदार विक्री केली आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे यांनी या कराराबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “ग्रेटर नोएडा हा नवीन प्रकल्प आमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करताना आम्हांला आनंद होत आहे. नोएडा परिसरातील आमच्या साध्या गृहप्रकल्पांना सतत मोठी मागणी मिळत आहे. त्यामुळे या बाजारपेठेत आम्ही उत्साही आहोत, याविषयी सकारात्मक आहोत. या नवीन प्रकल्पामुळे दिल्ली-एनसीआर राजधानी क्षेत्र मधील आमचे स्थान मजबून होईल. भारतातील प्रमुख शहरांमधील महतत्वाच्या बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार वाढवण्याच्या धोरणाला या प्रकल्पामुळे गती मिळेल.“
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर