
ठाणे, 24 जून (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात 65 लहान व मध्यम आकाराच्या अनधिकृत गोडाऊनवर निष्कसनाची कारवाई करण्यात आली. तर आतापर्यत एकूण 217 अनधिकृत गोडावून निष्कसित करण्यात आली असून 830 गोडावूनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली.
महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशान्वये, उपायुक्त (अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन) जितेंद्र निकम, उपायुक्त (परिमंडळ-१) दीपक झिजांड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर