बँकांनी विविध शासकीय योजनांमधील प्रलंबित कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत -हिंगोली जिल्हाधिकार
हिंगोली, 24 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकांच्या विविध योजनांअंतर्गत कर्जवाटप व प्रलंब
बँकांनी विविध शासकीय योजनांमधील प्रलंबित कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत -हिंगोली जिल्हाधिकार


हिंगोली, 24 जून (हिं.स.) : जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकांच्या विविध योजनांअंतर्गत कर्जवाटप व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक, शिखर बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा प्रतिनिधी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महिला बचत गटांना कर्जपुरवठा, कृषी कर्जमाफी तसेच इतर शासकीय योजनांअंतर्गत बँकांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध योजनांतील प्रलंबित कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी व वितरण प्रक्रियेत अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन समन्वयाने काम करावे, असे आवाहन केले.

कृषी व स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी पीक कर्ज, उद्योग कर्ज तसेच बचत गटांच्या कर्ज प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देऊन त्वरित कर्जवाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले. बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande