मोकाट गुरांसाठी रत्नागिरीत प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू
रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतील प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू करण्यात आला आहे. अशी संस्था मिळाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल असे पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले. रत्ना
मोकाट गुरांसाठी रत्नागिरीत प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू


रत्नागिरी, 24 जून (हिं.स.) । शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतील प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू करण्यात आला आहे. अशी संस्था मिळाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल असे पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यांत मोकाट गुरांचा सुळसुळाट कमालीचा वाढला असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारक अत्यंत त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि विशेषतः प्रचंड गर्दीचे ठिकाण असलेला आठवडाबाजार परिसरात या मोकाट जनावरांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. रस्त्यांच्या मधोमध ठिय्या मांडून बसणाऱ्या या गुरांमुळे दुचाकी आदळून तसेच घसरून गंभीर दुखापत होण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. भाजीबाजार किंवा गर्दीच्या ठिकाणी ही गुरे आपापसात भिडल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी पळापळ होते. अशा घटनांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर मोकाट गुरांनी हल्ला केल्याच्या आणि त्यांना जखमी केल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार प्राणी मित्र संस्थेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande