
छत्रपती संभाजीनगर, 25 जून, (हिं.स.)। लाडसावंगी व औरंगपूर परिसरात १ कोटी २५ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला मुख्य रस्त्यासह अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहे.फुलंब्री मतदारसंघातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि पायाभूत सोयी-सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकाम सुरू आहे.
याच विकास पर्व अंतर्गत लाडसावंगी आणि सय्यदपूर-औरंगपूर परिसरात तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सय्यदपूर-औरंगपूर रोडचा प्रश्न आमदार चव्हाण यांनी विशेष पाठपुरावा करून मार्गी लावला असून, यासाठी ५० लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या रस्त्याअभावी आजवर स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता, मात्र आता या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन झाल्यामुळे या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी राजे संभाजी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दामू आण्णा नवपुते, छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.दत्ता भाऊ उकिर्डे, चेअरमन विजय काळे, बाबासाहेब भाऊ चौधरी, श्री.रवींद्र कुलकर्णी, श्री.रवींद्र पडुळ, श्री.सुदाम नाना पवार, श्री.पंडित भुगरे, श्री.निवृत्ती डीडोरे, श्री.बंडू गवारे आणि श्री.विजय गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते, लाडसावंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis