अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेहाची कचऱ्याच्या घंटागाडीतून वाहतूक
जळगाव , 27 जून (हिं.स.) अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमळनेर तालुक्यात समोर आला आहे. येथे अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेह चक्क नगरपरिषदेच्या कचऱ्याच्या घंटागाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर
अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेहाची कचऱ्याच्या घंटागाडीतून वाहतूक


जळगाव , 27 जून (हिं.स.) अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमळनेर तालुक्यात समोर आला आहे. येथे अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेह चक्क नगरपरिषदेच्या कचऱ्याच्या घंटागाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि जनमानसातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, पुढील दोन दिवसांत या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी किंवा ओळख पटवण्यासाठी कोणतेही नातेवाईक समोर आले नाहीत. शेवटी, कायदेशीर प्रक्रियेनंतर या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला नियम आणि माणुसकीनुसार, पालिका किंवा रुग्णालय प्रशासनाने या बेवारस मृतदेहाचा सन्मान राखून त्याची ‘शववाहिकेतून’ वाहतूक करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदाराने संवेदनशीलतेचा कळस गाठत, या मृतदेहाला थेट कचरा गोळा करणाऱ्या पालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकून स्मशानभूमीकडे नेले. मृतदेह घंटागाडीत ठेवला जात असतानाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले आणि नगरपालिकेच्या या असंवेदनशील कारभाराविरोधात अमळनेर शहरात संतापाची लाटच पसरली. या गंभीर प्रकाराची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अथवा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई करण्याची माहिती समोर आलीय.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande