
लातूर, 30 जून (हिं.स.) : लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी राहुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबत अधिकृत आदेश जारी केला.
विद्यमान आयुक्त श्रीम. मानसी या वैद्यकीय रजेवर जाणार असल्याने त्यांच्या रिक्त जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर मनपाच्या प्रशासनाची धुरा आता राहुल कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सध्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले कुलकर्णी लवकरच लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
या नियुक्तीनंतर लातूर महानगरपालिका प्रशासनात नव्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis