दिव्यांग व्यक्तींसाठी 'बीज भांडवल योजना; लाभासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगाराकरिता ''बीज भांडवल योजना'' जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ
दिव्यांग व्यक्तींसाठी 'बीज भांडवल योजना; लाभासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगाराकरिता 'बीज भांडवल योजना' जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

बँक नियमानुसार १.५ लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यावर, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत मंजूर कर्जाच्या २०% रक्कम सबसिडी (अनुदान) म्हणून दिली जाते.

यामध्ये अंध, कर्णबधीर आणि अस्थिव्यंग व्यक्ती पात्र (मतीमंद व्यक्ती अपात्र) अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. दिव्यांग प्रमाणपत्र (UDID) ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

तहसीलदार यांचे मार्च २०२७ पर्यंत वैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र.बेरोजगार प्रमाणपत्र आणि व्यवसायासाठी 'ना हरकत' प्रमाणपत्र.

रेशन कार्ड, मतदान कार्ड,आधार कार्ड क्रमांक वगळला, आणि दिव्यांग UDID प्रमाणपत्र.दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.व्यवसायाचे कोटेशन आणि प्रकल्प अहवाल.जागेबाबत भाडे पावती, करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा. अशी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

अर्जदारांनी योजनेच्या सर्व अटी व शर्ती वाचून आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज सहायक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावा. अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बाबासाहेब अरवत सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण जिल्हा परिषद यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande