शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी सिल्लोडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। दि. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठक पार
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। दि. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास सिरसाठ, माजी आमदार नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बैठकीत सर्व मान्यवरांनी जिल्हा बँकेच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कपबशी या चिन्हावरील बटण दाबून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande