सोलापूरात १५ ऑगस्टपर्यंत धावणार ‘पीएम ई-बस’; महापौरांनी घेतला आढावा
सोलापूर, 27 जून (हिं.स.)। सोलापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या ''पीएम ई-बस सेवा'' योजनेच्या अंमलबजावणीला आता कमालीची गती आली आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस मं
Jsj


सोलापूर, 27 जून (हिं.स.)। सोलापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी केंद्र शासनाच्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेच्या अंमलबजावणीला आता कमालीची गती आली आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० बसेस रस्त्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत बसेसची उपलब्धता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम, चार्जिंग सुविधा आणि बस पुरवठादार कंपनीसोबतच्या कराराबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

सोलापूर मनपासाठी एकूण १०० ई-बसेस मंजूर असून, यात ९ मीटर लांबीच्या ७० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या ३० बसेसचा समावेश आहे.

सोलापूरकरांना आधुनिक, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम करावे. आगामी १५ ऑगस्टपर्यंत १५ ते ३० बसेस शहरात कशा सुरू होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande