स्वराज्याच्या २०० दुर्गांची साक्षीदार शर्विका; रायगडावर ऐतिहासिक सन्मान
रायगड, 27 जून (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा मनात जपून दुर्गभ्रमंतीचा अनोखा विक्रम करणाऱ्या अलिबाग येथील आठ वर्षीय शिवकन्या शर्विका म्हात्रे हिचा रायगड किल्ल्यावर ऐतिहासिक सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या प
Sharvika, witness to the 200 forts of Swarajya; honored historically at Raigad.


Sharvika, witness to the 200 forts of Swarajya; honored historically at Raigad.


रायगड, 27 जून (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा मनात जपून दुर्गभ्रमंतीचा अनोखा विक्रम करणाऱ्या अलिबाग येथील आठ वर्षीय शिवकन्या शर्विका म्हात्रे हिचा रायगड किल्ल्यावर ऐतिहासिक सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पवित्र दिवशी रायगडाच्या राजसदरेवर झालेला हा गौरव सोहळा उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला.

अवघ्या आठव्या वर्षी शर्विकाने स्वराज्यातील तब्बल २०० वा दुर्ग 'रांगणा' सर करून दुर्गप्रेम, जिद्द आणि इतिहासाविषयीची आपली निष्ठा सिद्ध केली आहे. एवढ्या लहान वयात इतक्या मोठ्या संख्येने दुर्गभ्रमंती करणारी शर्विका अनेक बालकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

शर्विकाच्या या प्रवासातील विशेष बाब म्हणजे तिने सर केलेल्या प्रत्येक गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील पवित्र मातीचा संग्रह केला. स्वराज्याच्या इतिहासाशी भावनिक नाते जपणारी ही संकल्पना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पावन दिवशी संकलित केलेल्या २०० गडांच्या पायथ्याची पवित्र माती रायगडाच्या राजसदरेवर विधिवत पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली. हा भावनिक आणि ऐतिहासिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू आणणारा ठरला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शर्विका म्हात्रे हिचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. अलिबागच्या या छोट्या शिवकन्येने आपल्या कार्यातून दुर्गसंवर्धन, इतिहासप्रेम आणि शिवरायांच्या विचारांची नवी ज्योत प्रज्वलित केली आहे.

रायगडाच्या पवित्र भूमीवर झालेला हा सन्मान केवळ शर्विका म्हात्रे हिचाच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा ठरला आहे. तिच्या या प्रेरणादायी प्रवासातून नव्या पिढीला इतिहास जाणून घेण्याची, दुर्गसंवर्धनाची आणि आपल्या समृद्ध वारशाचे जतन करण्याची प्रेरणा निश्चितच मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande