
छत्रपती संभाजीनगर, 27 जून (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वामनराव रामचंद्र पांडे (वय ८८) यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
ते छत्रपती संभाजीनगर येथील नवभारत हौसिंग सोसायटी, सिडको एन-८ येथे वास्तव्यास होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सामाजिक व संघटनात्मक कार्य केले. तसेच देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक व पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते ज्येष्ठ क्रिकेटपटू विद्याधर पांडे, ज्येष्ठ पत्रकार व नाटककार गिरीधर पांडे, बुद्धिबळपटू शशीधर पांडे आणि शिरीष पांडे यांचे वडील होत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis