
पाटणा, 27 जून (हिं.स.)। खान ग्लोबल स्टडीजचे संचालक फैसल खान उर्फ खान सर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी पाटणा दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. कदमकुआं पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अद्ययावत केस डायरी सादर केली. न्यायालयाने केस डायरीचे पुनरावलोकन करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. आता या प्रकरणाची सुनावणी ३० जून रोजी होईल. या कालावधीत फैसल खानच्या अटकेला स्थगिती राहील. तुरुंगात असलेल्या त्याच्या दोन अंगरक्षकांच्या जामीन अर्जांवरही त्याच दिवशी सुनावणी होईल.
फैसल खानच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात सर्वांचे लक्ष न्यायालयाकडे लागले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान त्याच्या वकिलाने मुदतवाढीला वारंवार विरोध केला. मात्र, सरकारी वकील आणि ज्ञान बिंदूचे संचालक रोशन आनंद यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने केस डायरीचे सखोल पुनरावलोकन करण्यासाठी वेळ मागितला आणि आक्षेप घेतला. न्यायालयाने यासाठी तीन दिवसांची मुदत दिली.
फैसल खानचे वकील, अरविंद कुमार मौर यांनी सांगितले की, अद्ययावत केस डायरी सरकारी वकिलांना देण्यात आली आहे. अंतिम सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. अद्ययावत केस डायरीमध्ये पोलिसांनी लिहिले आहे की, २ जूनच्या रात्री झालेला गोळीबार आत्मसंरक्षणासाठी नसून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता. त्या घटनेसंदर्भातील एफआयआरमध्ये नंतर फैसल खानचे नाव जोडण्यात आले.
गेल्या २ जूनपासून घडलेल्या अनेक नाट्यमय घटनांमुळे या प्रकरणातील लोकांची उत्सुकता वाढली आहे. रोशन आनंदचा भाऊ, प्रिन्स यादव, याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. जामिनावर सुटलेल्या रोशन आनंदने फैसल खान आणि कोल्ड स्टोरेजच्या मालकावर हत्येचा थेट आरोप केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे