
मुंबई, 27 जून (हिं.स.) - प्रवाशांच्या मागणीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून दिवा ते चिपळूण (कोकण विभाग) दरम्यान सुट्टीच्या दिवसांत २ अनरक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
दिवा – चिपळूण – दिवा मेमू सुट्टीच्या दिवसांतील अनारक्षित विशेष गाड्या (२ सेवा)
गाडी क्र. 01160 मेमू अनारक्षित विशेष गाडी दिनांक २८.०६.२०२६ रोजी चिपळूण येथून १५.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २३.१० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01159 मेमू अनारक्षित विशेष गाडी दिनांक २८.०६.२०२६ रोजी दिवा येथून २३.२५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.
थांबे: (दिवा ते चिपळूण दरम्यान) :- निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजणी.
गाडीची संरचना: ०८ डब्यांची मेमू रॅक.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी