अहमदपूर एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नव्या अत्याधुनिक बसेस दाखल
लातूर, 28 जून (हिं.स.)। अहमदपूरकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, तसेच एसटी महामंडळाच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अहमदपूर एसटी बस
नवीन ५ बस


लातूर, 28 जून (हिं.स.)। अहमदपूरकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा, तसेच एसटी महामंडळाच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. अहमदपूर एसटी बस आगाराच्या ताफ्यात डिजिटल तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा ५ नवीन बसेस दाखल झाल्या असून, त्यांचे लोकार्पण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यापासून परिवहन विभागात नवनवीन प्रयोग केले जात आहेत, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या सहकार्यातूनच आज अहमदपूर आगाराला या अत्याधुनिक बसेस मिळाल्या आहेत. अहमदपूर आगार आणि मतदारसंघातील विविध बसस्थानके आता अद्ययावत होत असून, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना होणार आहे.

अहमदपूर बस स्थानक परिसरात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यात मंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून या नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आल्या. या बसेसमुळे गेल्या काही काळापासून बस फेऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि जुन्या बसेसमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

याप्रसंगी बाबासाहेब कांबळे, शिवाजीराव देशमुख, अजहरभाई बागवान, अय्याजभाई शेख यांच्यासह एसटी महामंडळाचे विविध अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

जनसामान्यांच्या प्रवासाच्या गरजा ओळखून विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या या भूमिकेचे अहमदपूरकरांकडून कौतुक केले जात आहे. नवीन बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित आणि सुखद होणार असल्याने नागरिकांनी मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande