‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलिसांना सीसीटीव्ही यंत्रणा भेट
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । येथील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, क्राइम ब्रँचचे श
रत्नागिरी पोलिसांना सीसीटीव्ही यंत्रणा प्रदान करण्यात आली


रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । येथील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, क्राइम ब्रँचचे श्री. बोरकर यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा ‘अनबॉक्स’चे गौरांग आगाशे यांच्या हस्ते पोलीस दलाकडे हस्तांतरित करण्यात आली.

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले असून, घरफोड्यांचेही अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना खूप त्रास होतो. हे लक्षात घेऊन त्यांना तपास करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा देण्याचा विचार ‘अनबॉक्स’तर्फे करण्यात आला.

यावेळी झालेल्या छोट्याशा कार्यक्रमावेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, क्राइम ब्रँचचे श्री. बोरकर, आगाशे स्टोअर्सचे सर्वेसर्वा अनंत आगाशे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नाचणे गावाचे सरपंच भैया भोंगले, ग्रामपंचायत सदस्या सौ. दीप्ती फडके, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अमोल सावंत, ओम साई मित्रमंडळाचे खजिनदार पराग सावंत, मनीष टेक्नो प्रिंटचे मनीष शिंदे व ‘अनबॉक्स’च्या नेहा गोखले, भाग्यश्री सुर्वे, स्पृहा जोगळेकर, कपिल शेवडे, डिलिव्हरी पार्टनर प्रतिनिधी प्रवीण पाटील, आगाशे स्टोअर्सचे नितेश वारिशे, आगाशे फूडकोर्टच्या सानिका नवले, नंदाई डिजिटलचे धीरज पाटकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande