‘फोर्ट’मधील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित वसुलीची नोटीस !
* २१ दिवसांत रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी ! * हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई ! मुंबई, 28 जून (हिं.स.) - येथील फोर्ट भागातील शासकीय भूमीचा ‘द चर्च ऑफ स्कॉटलंड ट्रस्ट’कडे तब्बल ३३ वर्षांपासून अनधिकृतपणे ताबा आहे
‘फोर्ट’मधील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित वसुलीची नोटीस !


* २१ दिवसांत रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी !

* हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई !

मुंबई, 28 जून (हिं.स.) - येथील फोर्ट भागातील शासकीय भूमीचा ‘द चर्च ऑफ स्कॉटलंड ट्रस्ट’कडे तब्बल ३३ वर्षांपासून अनधिकृतपणे ताबा आहे. या प्रकरणी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने चर्चला थकित वसुलीची अंतिम नोटीस बजावली आहे.

भूकर क्रमांक १४०५ येथील ११३७.३२ चौरस मीटर भूमीचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी ‘द चर्च ऑफ स्कॉटलंड ट्रस्ट’ला ३१ लाख ७४ सहस्र ८९५ रुपयांच्या थकित वसुलीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या २१ दिवसांत ही रक्कम शासकीय खात्यात जमा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी प्रशासनाने दिली आहे. येथील शासकीय भूमी १८ जून १८९४ या दिवशी ‘फ्री चर्च ऑफ स्कॉटलंड’ या संस्थेला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्यात आली होती. या भाडेपट्ट्याची मुदत १३ जून १९९३ रोजीच संपुष्टात आली आहे; मात्र मुदत संपून ३३ वर्षे उलटली तरी शासनाने ही भूमी कह्यात घेतली नव्हती किंवा भाडेपट्ट्याचे नूतनीकरणही केले नव्हते.

हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा !

हिंदु विधीज्ञ परिषदेने या गंभीर प्रकरणाची नोंद घेत महसूल विभागाकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली होती की. मूळ भाडेकरू संस्था आता अस्तित्वात नाही आणि ‘चर्च ऑफ सेंट अँड्र्यू अँड सेंट कोलुंबा’ ही संस्था कोणत्याही अधिकृत कायदेशीर हस्तांतरणाशिवाय या मौल्यवान भूमीचा अनधिकृत वापर करत आहे असे दिसते

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande