कार्यकर्ता सर्वोपरी' म्हणत आ. देवेंद्र कोठे यांनी ऐकली 'मन की बात'
सोलापूर, 28 जून (हिं.स.)। ''कार्यकर्ता सर्वोपरी'' म्हणत आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्वसामान्य निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ''मन की बात'' कार्यक्रम ऐकला. रविवारी झालेल्या या कार्यक्रमानंतर नागरिकांनी आमदार द
Ksnsk


सोलापूर, 28 जून (हिं.स.)। 'कार्यकर्ता सर्वोपरी' म्हणत आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्वसामान्य निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम ऐकला. रविवारी झालेल्या या कार्यक्रमानंतर नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या या भूमिकेचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील नागरिकांशी संवाद साधतात. आमदार देवेंद्र कोठे हा कार्यक्रम नियमितपणे मतदारसंघात उपस्थित राहून पाहतात. रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असलेले शक्तिकेंद्र प्रमुख दास भंडारी यांच्या घरी जाऊन मन की बात कार्यक्रम ऐकला.

दास भंडारी हे भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ काम पाहतात. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्यानंतरही प्रभागातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी स्वतः विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर धडपड करतात. अशा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांची निवड करून 'मन की बात' ऐकण्यासाठी शक्ती केंद्रप्रमुख दास भंडारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी नगरसेवक मेघनाथ येमूल उपस्थित होते.

पत्र्याचे घर असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत चहापान करत कार्यकर्त्यांची, कुटुंबीयांची तसेच परिसरातील नागरिकांची विचारपूस करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या या कृतीचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.

कार्यकर्त्यांच्या घरीच ऐकणार मन की बात

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यात आणि देशभरात यशामागे भाजपच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हीच भूमिका ठेवून यापुढे प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम पाहण्याचा मानस आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande