यंदापासून ई-पीक पाहणीची जबाबदारी सहायकांवर
नांदेड, 28 जून (हिं.स.)।सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यंदापासून स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज राहणार नाही. ई-पीक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला
यंदापासून ई-पीक पाहणीची जबाबदारी सहायकांवर


नांदेड, 28 जून (हिं.स.)।सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यंदापासून स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज राहणार नाही. ई-पीक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, १५ जुलैपासून तहसील स्तरावर नियुक्त विशेष सहायक थेट शेतात जाऊन पीक पेरा नोंदणी करणार आहेत.

शासकीय योजना, पीक कर्ज, पीकविमा तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानभरपाई मिळण्यासाठी सातबारावरील पीक नोंद महत्त्वाची मानली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना मोबाइल अॅपद्वारे स्वतः ई-पीक पाहणी करावी लागत होती. मात्र ग्रामीण भागात स्मार्टफोनची मर्यादित उपलब्धता, इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कच्या अडचणींमुळे अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहत होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने विशेष सहायकांमार्फत पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील १,५६० महसुली गावांमध्ये पीक पाहणी प्रभावीपणे राबविण्यासाठी ५२५ पर्यवेक्षक आणि १,६०० विशेष सहायकांची नियुक्ती करण्यात येत आहे. सातबारावरील पीक नोंदी अधिक अचूक करणे आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

विशेष सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करतील आणि सातबारावर अधिकृत पीक नोंद करतील. त्यामुळे नोंदी अधिक अचूक होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. मोहिमेला गती देण्यासाठी महिला बचत गटांचाही सहभाग घेतला जाणार आहे. बचत गटातील महिलांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून पीक पाहणीचे काम करून घेतले जाणार आहे. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या 'अॅग्रिस्टॅक' डिजिटल कृषी परिसंस्थेशी जोडण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande