समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची धडक एकाच कुटुंबातील पाच जण ठार
अमरावती, 28 जून (हिं.स.) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रविवारी (दि.28) भीषण अपघात झाला. चंद्रपूर वरून अकोल्याला निघालेल्या निघालेल्या भरधाव कारनं समोरून जात असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. धडकीची
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची धडक एकाच कुटुंबातील पाच जण ठार


अमरावती, 28 जून (हिं.स.) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रविवारी (दि.28) भीषण अपघात झाला. चंद्रपूर वरून अकोल्याला निघालेल्या निघालेल्या भरधाव कारनं समोरून जात असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. धडकीची तीव्रता प्रचंड असल्यामुळं कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनातील सर्व प्रवाशांना बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

एका कार्यक्रमानिमित्त चंद्रपूर येथील जीवणे कुटुंब अकोल्याला आपल्या चारचाकी वाहनातून अकोल्याला जात होते. मात्र, समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारनं ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. भीषण अपघात इतका भीषण होता की कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यु झाला. या घटनेमुळं समृद्धी महामार्गावर खळबळ उडाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही काळ बचाव कार्य सुरू होतं. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

नागपूरच्या दिशेनं मुंबईकडं भरधावेगत जाणाऱ्या कारनं समोर असणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. कारचा वेग प्रचंड असताना समोर धावणाऱ्या ट्रकच्या जवळ कार अतिशय वेगात पोहोचली आणि कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं भरधाव वेगात असणारी ही कार थेट ट्रकच्या मागे धडकली, असं घटनास्थळीचं चित्र पाहताना स्पष्ट होतं. भास्कर जीवणे, रमेश जीवणे, लता जीवणे, आरती जीवणे, आणि दहा वर्ष वयाची त्रिशा जीवणे अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande