मोर्शीत बोगस बियाण्यांवर कारवाई; 86 बियाण्यांचे पाकीट जप्त
अमरावती, 28 जून (हिं.स.) | शासन मान्यता नसलेल्या बोगस बियाण्यांची साठवणूक करून ते शेतकऱ्यांना जास्त भावाने विक्री करीत असलेल्या अंबाडा येथील जामा मस्जीद परिसरात कृषी अधिकारी व मोर्शी पोलिसांनी धाड टाकून जवळपास 86 बियाण्यांचे पाकीट जप्त करण्यात येऊन
कृषी विभाग व पोलिसांची सयुक्त कारवाई प्रतिबंधित कपाशी बियाण्याचा साठा पकडला


अमरावती, 28 जून (हिं.स.) | शासन मान्यता नसलेल्या बोगस बियाण्यांची साठवणूक करून ते शेतकऱ्यांना जास्त भावाने विक्री करीत असलेल्या अंबाडा येथील जामा मस्जीद परिसरात कृषी अधिकारी व मोर्शी पोलिसांनी धाड टाकून जवळपास 86 बियाण्यांचे पाकीट जप्त करण्यात येऊन १ लाख ३९ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मोर्शी पोलिसस्टेशनच्या हद्दीतील अंबाडा येथे बनावट एचटीबीटीच्या कपाशीचे बियाणे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मोर्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल चौधरी यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी उचित कार्यवाही करण्याच्या दृष्टीने मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांना पत्र देऊन पोलिसांची मदत घेतली.मोर्शी तालुका कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक दिनेश चौधरी, सहायक कृषी अधिकारी मनीष काळे, मनोज लंगोटे व मोर्शी पोलिस ठाण्यातील अंबाडा बीटचे पो. कॉ. मंगेश बदुकले यांनी जामा मस्जीद परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अफजल जाफर खान अहमदखान यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून सोमनाथ महादेव कंपनीचे २३ पाकीट, व्हाईट गोल्ड जम्बोचे २० पाकीट, तिलाक फाईव्ह जी १८ पाकीट, सोमनाथ ६५९ फाइवजी २५ पाकीट असे एकूण ८६ पाकीट आढळून आले.

सदरचे ८६ बनावट बियाण्यांचे पाकीट जप्त करण्यात आले. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी फिर्यादी दिनेश चौधरी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या ताब्यातून १ लाख २९ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला विचारपूस केली असता बियाणे साठवणूक करण्याचा कुठलाही परवाना नसून एचटीबीटी बियाण्याचे पाकीट आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. पुढील तपास ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलिस करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande