
परभणी, 28 जून (हिं.स.)।
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारीका बडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शिंदे, डॉ. कल्याण कदम तसेच डॉ. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते यावेळी बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. यावेळी पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजण्याचे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis