
बीड, 28 जून (हिं.स.)।
भाजप आमदार नमिता मुंदडा या आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान २०२६ निमित्त नागरी रुग्णालय, मंडी बाजार, अंबाजोगाई येथे आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होत लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजत राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ केला.
यावेळी उपस्थित आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसेवक तसेच बालकांच्या पालकांशी संवाद साधून अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा दिल्या.
० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मिळणे हे पोलिओमुक्त, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक पालकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या परिसरातील एकही बालक या संरक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis