लसीकरण शिबिरानंतर झालेल्या मुलीच्या मृत्यूबाबत अधिवेशनात प्रश्न विचारणार - आमदार सीमा हिरे
पाटील कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन नाशिक, 28 जून (हिं.स.)। : खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरानंतर १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आमदार सीमा हिरे यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत, सांत्वन केले. तसेच चौकशीचे आदेश दिले आह
लसीकरण शिबिरानंतर झालेल्या मुलीच्या मृत्यूबाबत अधिवेशनात प्रश्न विचारणार - आमदार सीमा हिरे


पाटील कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन

नाशिक, 28 जून (हिं.स.)।

: खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरानंतर १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आमदार सीमा हिरे यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत, सांत्वन केले. तसेच चौकशीचे आदेश दिले आहेत. लसीकरणाबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित लसीकरण केंद्रात सुरू असलेला लसीकरण स्लॉट तत्काळ स्थगित करण्याचे निर्देश दिले असून, घटनेची वैद्यकीय व प्रशासकीय स्तरावर निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणणार असल्याचेही आमदार हिरे यांनी सांगितले.

महापालिका आरोग्य विभागाकडून खुटवडनगर येथे आयोजित एचपीव्ही लसीकरण शिबिरानंतर घरी परतताना श्रावणी अनिल पाटील (१६) हिला अचानक भोवळ येऊन ती रस्त्यावर कोसळली होती. लस घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ही घटना घडली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २४) दुपारी १ च्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार हिरे यांनी खुटवडनगर येथे मृत श्रावणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी नगरसेवक शरद फडोळ, भाजप. मंडलाध्यक्ष डॉ. वैभव महाले यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते स्थानिक रहिवासी उपस्थित होते. शासनाकडून महिला व मुलींसाठी मोफत कॅन्सर प्रतिबंधक एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगर येथील मारुती मंदिर आवारात लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande