नांदेड नाका, कला मंदिरसमोर एका पावसातच रस्ता जलमय
लातूर, 28 जून (हिं.स.)। उदगीर शहरातील नांदेड नाका, कला मंदिरसमोरील परिसरात झालेल्या एका पावसातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालकांना जी
पावसामुळे रस्ते झाले जलमय


लातूर, 28 जून (हिं.स.)।

उदगीर शहरातील नांदेड नाका, कला मंदिरसमोरील परिसरात झालेल्या एका पावसातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

पावसाचे पाणी योग्य प्रकारे न वाहून गेल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. एका पावसातच अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर मुसळधार पावसात काय होईल, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande