
नांदेड, 28 जून (हिं.स.)।
पंतप्रधानांनी देशभरातील विविध सामाजिक घडामोडी व उपक्रमांबद्दल देशवासीयांना माहिती दिली. ती प्रेरक आहे असे मत माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले नांदेड येथील कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे आज अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रवण करण्यात आले.
नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,भाजपा महानगर अध्यक्ष तथा आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, महापौर सौ. कविताताई मुळे आदींसह हा कार्यक्रम पाहिला. नेहमीप्रमाणे या महिन्यातही पंतप्रधानांनी देशभरातील विविध सामाजिक घडामोडी व उपक्रमांबद्दल देशवासीयांना माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis