राजगड सहलीसाठी जाणाऱ्या बसचा पाबे घाटात भीषण अपघात; मुंबईतील दोघांचा मृत्यू
पुणे, 28 जून (हिं.स.)। राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हल्स बसला पुणे जिल्ह्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा
बस अपघात


पुणे, 28 जून (हिं.स.)। राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हल्स बसला पुणे जिल्ह्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 20 पर्यटकांचा एक गट ट्रॅव्हल्स बसने राजगड किल्ला पाहण्यासाठी रवाना झाला होता. वेल्हा आणि हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या पाबे घाटातून प्रवास सुरू असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. अपघातामुळे बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून दरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande