पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा; प्रणिती शिंदे यांचा सरकारवर हल्लाबोल
सोलापूर, 28 जून (हिं.स.)। राज्यातील स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी सोलापुरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. मो
Hhg


सोलापूर, 28 जून (हिं.स.)।

राज्यातील स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी सोलापुरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. मोर्चात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप केला. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सरकारवर टीका करत, राज्यात वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असताना सरकार प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकारांना तातडीने आळा घालावा, तसेच पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधारांवर कठोर कारवाई करून भरती प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्यांनी केली.

मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande