
अमरावती, 28 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या १०८ विकासकामांच्या प्रक्रियेची लगबग सुरू झाली. आचारसंहितेमुळे रखडलेल्या निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय कार्यवाही आता वेगाने सुरू करण्यात आली असून, बांधकाम विभागात यासाठी अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.
रस्ते, इमारत बांधकाम, तीर्थक्षेत्र जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकास तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या महिनाभरापासून ही प्रक्रिया ठप्प होती. थांबवावी लागली होती. त्यामुळे तब्बल कामांच्या निविदा उघडणे ही प्रक्रिया आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने संबंधित १०८ कामांच्या निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होणार आहे. पावसाळ्यानंतर अनेक कामांना वेग देण्याचे नियोजन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळणार आहे. या कामांमध्ये असल्याने ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश रस्ते, शासकीय इमारती, तीर्थक्षेत्र विकास मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी