
नांदेड, 28 जून (हिं.स.)।
काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित एस.आय.आर. (SIR) संदर्भातील महत्त्वपूर्ण प्रशिक्षण बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, नवा मोंढा, नांदेड येथे संपन्न झाली.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर विभागातील विधानसभा मतदारसंघातील BLA2(भारत रक्षक ) यांना SIR प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, बी.एल.ए.-२ व भारतरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis