नियमाकुल घरकुल जागेवर मेंढपाळांचे अतिक्रमण ! लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत
अमरावती, 28 जून (हिं.स.) अंजनगाव बारी येथील नियमाकुल घरकुल योजनेसाठी राखीव जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात मेंढपाळांनी कळपांसह तात्पुरता तळ ठोकल्याने अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. शेकड़ों मेंढ्या या जागेवर चराईसाठी व वास्तव्यास असल्याने घरकुलासा
नियमाकुल घरकुल जागेवर मेंढपाळांचे अतिक्रमण ! लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत


अमरावती, 28 जून (हिं.स.)

अंजनगाव बारी येथील नियमाकुल घरकुल योजनेसाठी राखीव जागेवर सध्या मोठ्या प्रमाणात मेंढपाळांनी कळपांसह तात्पुरता तळ ठोकल्याने अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. शेकड़ों मेंढ्या या जागेवर चराईसाठी व वास्तव्यास असल्याने घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.घरकुल योजनेचे लाभार्थी अनेक महिन्यांपासून स्वतः व्या घराच्या प्रतीक्षेत आहेतः मात्र या जागेवर पिण्याच्या पाण्यासाठी केवळ कूपनलिका (हापशी) उपलब्ध असून रस्ते, वीज, गटारे, जलनिस्सारण आदी मूलभूत सुविधा अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यातच अतिक्रमणामुळे घरकुल उभारणीस अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त भविष्यात केली जात आहे.दरम्यान, अंजनगाव बारी-कोंडेश्वर रोडवर सुरु असलेल्या रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात गिट्टी, रेती व डस्टचे ढीग रस्त्यालगत टाकण्यात आले आहेत त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून परिसराचे सौंदर्यही बिघडत आहे. या साहित्याचा वापर अत्यंत संथ गतीने होत असल्याने ते अनेक दिवसापासून रस्त्यालगत पडून आहे.स्थानिक प्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने या दोन्ही गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमाकुल घरकुल जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच रस्त्यालगत पडून असलेले बांधकाम साहित्य हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande