सोलापूर महापालिकेच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
सोलापूर, 28 जून (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा आज दाराशा हॉस्पिटल येथे महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौरांनी एका बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दो
Jsjd


सोलापूर, 28 जून (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाचा आज दाराशा हॉस्पिटल येथे महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौरांनी एका बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली.

या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, अतिरिक्त आयुक्त विना पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर विनायक कोंडयाल यांनी पालकांना आवाहन करताना, पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरभर विविध लसीकरण केंद्रे तसेच फिरत्या पथकांद्वारे पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि संबंधित यंत्रणा कार्यरत असून सर्व पालकांनी या राष्ट्रीय आरोग्य अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

----------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande