
नांदेड, 28 जून (हिं.स.)।
वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप (स्मार्ट) सौर योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत घरांच्या छतावर, कौलारू तसेच पत्र्याच्या घरांवर सौर पॅनेल बसवून स्वतःची वीजनिर्मिती करण्याची सुविधा उपलब्ध होत असून, अनेक कुटुंबांना शून्य वीजबिलाचा लाभ मिळणार आहे.
किमान एक किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसविल्यास दरमहा सुमारे १३० युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे घरगुती वापरासाठी लागणारी वीज स्वतःच उपलब्ध होऊन वीजबिलात मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात अधीक्षक अभियंता संजय कंधारे, कार्यकारी अभियंता चव्हाण आणि उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बारड ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गतही विशेष जनजागृती मोहीम सुरू असून, याच अनुषंगाने
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis