व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही ;मालाच्या नमुन्याची तपासणी 24 तासात मिळण्याचे नियोजन - झिरवाळ
Traders will not face any problems; Planning to get the goods sample checked within 24 hours - Jirwal
Traders will not face any


अन्न व औषध प्रशासन मंत्री . झिरवाळाची व्यापाऱ्यांनी घेतली भेट

नाशिक, 28 जून (हिं.स.)।

व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन सरकार व्यापारी उद्योजकांच्या पाठीशी आहे. व्यापाऱ्यांच्या मालाच्या नमुन्याची तपासणी लॅबमधून 24 तासात करून मिळावी यासाठी नियोजन सुरु आहे. मालाची तपासणी पूर्ण होऊन लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत व्यापारी दोषी नसतो त्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही. असे आश्वासन राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यापाऱ्यांना देताना सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमानुसार काम सुरू असून व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, चुकीची कारवाई होणार नाही असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला दिले.

रविवार, दिनांक 28 जून 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्री . नरहरी झिरवाळ यांची त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. सुनिता फाल्गुने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. याप्रसंगी उपाध्यक्षा सौ. सुनिता फाल्गुने यांनी निवेदन देऊन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्माण झालेल्या अडचणीबाबत माहिती देत नमुना तपासणीसाठी गेल्यानंतर तीन महिन्याने रिपोर्ट येतो, रिपोर्ट येईपर्यंत व्यापाऱ्याला दोषी ठरवू नये. तसेच व्यापाराचे हीत व ग्राहकाचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने २४ तासांच्या आत रिपोर्ट मिळावा अशी यंत्रणा तयार करण्यात यावी. कोणत्याही कायद्यात बदल केल्यानंतर सहा महिन्यांचा ग्रेस पिरियड देण्यात यावा व त्या कायद्याची जनजागृती ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये करण्यात यावी. विनाकारण होणारी व्यापाऱ्यांची बदनामी व त्रास थांबवावा अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तेल व्यापारी असोसिएशन महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रकाश पटेल यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या.माजी विश्वस्त विलास शिरोरे यांनी ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या. कार्यकारिणी सदस्य गंगाधर निखाडे यांनी गावातील छोटे व्यापारी त्रस्त असून व्यापार करणे स्पर्धेच्या काळात कठीण झाल्याचे सांगितले.शिष्टमंडळात माजी विश्वस्त विलास शिरोरे, कार्यकारिणी सदस्य डॉ. मिथिला कापडणीस, सचिन शहा, आशुतोष गायकवाड, गंगाधर निखाडे, स्वप्नील जैन, महेश मालपुरे, दिपक शेंडे, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल, चांदमलजी भन्साळी, मदन पिचा,प्रदीप भांगडीया,विलास भाऊ, ज्ञानेश्वर मुर्तडक,पंकज लोढा,पवन लोढा, भूपेंद्रसिंग रेखी,संतोष आहिरे, ललीत सामनानी,श्याम सामनानी, श्याम लढढा,आकाश डागा, सहायक सचिव अविनाश पाठक आदि उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande