रत्नागिरी : देवरूखच्या श्री गणेश वेदपाठशाळेत वृक्षारोपण उत्साहात
रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळेत विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांची रोपे लावण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक निखिल भिडे आणि मदन वामन मोडक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या परिसरात काजू, र
गणेश पाठशाळेत वृक्षारोपण


रत्नागिरी, 28 जून (हिं.स.) । देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळेत विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांची रोपे लावण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक निखिल भिडे आणि मदन वामन मोडक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शाळेच्या परिसरात काजू, रातांबे, चिकू, पेरू, चिंच, नारळ, वड, पिंपळ आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या रोपांचा तसेच खड्डे खोदून लागवड करण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च मदन वामन मोडक आणि हेमंत श्रीपाद तांबे यांनी उचलून वेदपाठशाळेला मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमात हेमंत तांबे यांचे सहकार्य उपस्थितांनी आवर्जून नमूद केले. यावेळी वेदमूर्ती विज्जल आचार्य गुरुजी, शाळेचे विश्वस्त प्रकाश पत्की, मिलिंद जुवेकर, व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, तसेच वेदपाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, शाळेलगतच्या नदीकाठी आमदार शेखर निकम यांच्या निधीतून गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे ही जागा सुरक्षित झाली असून, त्याच परिसरात वृक्षारोपण करून जागेचा पर्यावरणपूरक उपयोग करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande