
रायगड, 28 जून (हिं.स.)। : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील एका फार्महाऊसमधून सुमारे ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याप्रकरणी दिधी (सागरी) पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते २७ जून २०२६ रोजी सकाळी ७ या कालावधीत वडवली येथील कोळंबी प्रकल्पाजवळ असलेल्या फार्महाऊसमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दिधी (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार २७ जून २०२६ रोजी रात्री ११.४४ वाजता आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी दिधी (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ नोंद असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)