
बीड, 28 जून (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील श्री शंभुलिंग शिवाचार्य मठ संस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या संवादात्मक कार्यक्रमाच्या १३५व्या भागाचे पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्या समवेत श्रवण केले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा येथील पैठकर परिवाराने विवाहसोहळ्याच्या निमित्ताने गावातील तब्बल ३,५०० नागरिकांना अपघात विमा संरक्षणाची भेट देत समाजहिताचा आदर्श निर्माण केल्याचा विशेष उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भर भारत, मेड इन इंडिया उपक्रम, तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी, नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि विज्ञाननिष्ठ भारताच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संदेशही मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या मनोगतातून दिला. या कार्यक्रमाला प्रभागातील व परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis