गुलाबराव पाटलांकडून जळगावमधील 4000 वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरला रवाना
जळगाव, 28 जून, (हिं.स.) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी जळगाव ते पंढरपूर विशेष वारकरी रेल्वेचे आयोजन करण्यात आले असून, ४ हजारांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने जळगाव रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरकड
गुलाबराव पाटलांकडून जळगावमधील 4000 वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरला रवाना


जळगाव, 28 जून, (हिं.स.) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी जळगाव ते पंढरपूर विशेष वारकरी रेल्वेचे आयोजन करण्यात आले असून, ४ हजारांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेने जळगाव रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरकडे रवाना झाले. त्यामुळे वारकरी भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण असून या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. या सेवेसाठी विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे खरे भाग्य आहे. हजारो वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची सेवा करण्याची संधी लाभणे, हेच माझ्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठे समाधान आहे,” असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ. प.गजानन महाराज वरसाडेकर हे होते.जळगाव ग्रामीण व शहराने आज एका अद्वितीय आणि अविस्मरणीय भक्ती सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला. आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande