जन्मोजन्मी हाच पती मिळवण्यासाठी वडाच्या झाडाची कत्तल
सातारा, 28 जून (हिं.स.)। दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला घरोघरी साजऱ्या होणाऱ्या जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणत साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमा व्रतासाठी काही वर्षांपर्यंत महिला या वडाची पूजा करण्यासाठी परिसरातील वटवृक्षाला पूजा करून सात फेरे
जन्मोजन्मी हाच पती मिळवण्यासाठी वडाच्या झाडाची कत्तल


सातारा, 28 जून (हिं.स.)। दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला घरोघरी साजऱ्या होणाऱ्या जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणत साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमा व्रतासाठी काही वर्षांपर्यंत महिला या वडाची पूजा करण्यासाठी परिसरातील वटवृक्षाला पूजा करून सात फेरे मारत असत. मात्र आधुनिक बदलत्या युगाची नांदी आणि त्यात वेळ नाही यामुळे घरोघरी वडाची फांदी आणून त्याच्याभोवतीच सात दोरे गुंफून स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घालण्याची पूजेची परंपरा सुरू झाली. मात्र या वटपौर्णिमेच्या व्रतासाठी शेकडो वडाच्या झाडांच्या फांद्यांची कत्तल करून ही वडाची फांदी सातारा शहरातील राजवाडा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे.

सोमवारी साजरे होणाऱ्या या व्रत्तासाठी चक्क शनिवारपासूनच असे वडांच्या हिरव्यागार फांद्यांचे ढीग राजवाडा परिसरात गोलबाग तसेच मंगळवार तळे रस्त्यावर विक्री होताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरण विषयक विचार करण्यापेक्षाही सामान्य नागरिकांनी विशेष करून महिलांनी अशा फांदीची पूजा करण्याऐवजी मानसपूजा करून वडाची पूजा केली तरी चालेल असेच म्हणण्याची वेळ आली आहे. तरच हा निसर्गाचा ऱ्हास थांबू शकेल नाही का ?

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande