सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 28 जून (हिं.स.)। पोलिओमुक्त भारतासाठी एक पाऊल आज टाकण्यात आले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. ० ते ५ वर्षे वयोगटातील प
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 जून (हिं.स.)। पोलिओमुक्त भारतासाठी एक पाऊल आज टाकण्यात आले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले.

० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजा. प्रत्येक बालकाचे लसीकरण हीच आपल्या सर्वांची जबाबदारी. असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर , उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश वैष्णव तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande