अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कर्मचाऱ्यांच्या गृहिणींचा आरोप
अमरावती, 29 जून (हिं.स.) अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडला असून, प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वीच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च क
पावसाळा सुरू होताच क्वार्टर्सला लागली गळती;


अमरावती, 29 जून (हिं.स.)

अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडला असून, प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वीच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांच्या पत्नी व गृहिणींनी केला आहे.सध्या वसाहतीमधील रस्ते पूर्णपणे उखडले असून, बसवलेले पेव्हर ब्लॉक बाहेर निघाले आहेत. इतकेच नव्हे तर, निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी क्वार्टर्समध्ये गळत आहे. कॉलनीमध्ये लहान पाईपलाईनमुळे पिण्याचे पाणी येत नाही, अंधाराचे साम्राज्य असूनही पुरेसे स्ट्रीट लाईट्स नाहीत आणि अंतर्गत नाल्या तुंबल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वसाहतीची ही दुरवस्था दूर करून प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande