
लातूर, 29 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात २९ जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये रेणापूर तालुक्यात सर्वाधिक २९.७ मिलीमीटर, तर देवणी तालुक्यात सर्वात कमी १.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- २१.७, औसा- ६.०, अहमदपूर- १४.४, निलंगा- १.९, उदगीर- १६.२, चाकूर- २१.०, रेणापूर- २९.७, देवणी- १.२, शिरूर अनंतपाळ- १३.३ आणि जळकोट- १५.७ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis