
रत्नागिरी, 29 जून (हिं.स.) । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ येत्या १९ जुलै रोजी होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कार्यालयात हा कार्यक्रम १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील ६५ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रासह आपली नोंदणी १० जुलैपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन कार्यालयात करावी, असे आवाहन अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी