नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : प्रणिता देवरे चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
नांदेड, 29 जून (हिं.स.) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी कंधार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच लोहा मतदारसंघातून पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव
अ


नांदेड, 29 जून (हिं.स.) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी कंधार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच लोहा मतदारसंघातून पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रणिता देवरे चिखलीकर यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील शेती व सहकार क्षेत्राला आर्थिक बळकटी देण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपत सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद मतदारांच्या आशीर्वादाने समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे, सचिन पाटील चिखलीकर, स्वप्नील लुंगारे, अनिल पाटील बोरगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande