लातूर- बेकायदेशीर हॉस्पिटल्सवर कायदेशीर कारवाईची मागणी
लातूर, 29 जून (हिं.स.)लातूर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करून अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉस्पिटल्सवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने लातूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक खासगी रुग्णालये नियमांचे उल्लंघन करून सुरू असून, आवश्यक परवानग्या व निकषांची पूर्तता न करता काही ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक रुग्णालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक बेड, आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती, अग्निसुरक्षा उपाययोजनांचा अभाव, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही गंभीर त्रुटी असल्याचा दावा समितीने केला आहे.

यामुळे रुग्णांच्या जीविताशी खेळ होत असल्याचे सांगत, शहरातील सर्व खासगी हॉस्पिटल्सची सखोल तपासणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हे निवेदन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष ऍड. निलेश करमुडी, प्रदेशाध्यक्ष हणमंत गोत्राळ, महिला प्रदेशाध्यक्ष रेणुका बोरा, जिल्हाध्यक्ष विशाल हाके शहराध्यक्ष मुस्तफा सय्यद तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सादर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande