सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह
बीड, 29 जून (हिं.स.)। श्री माऊली महाराज समाधी मंदिर, श्रीक्षेत्र चाकरवाडी, ता. जि. बीड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री
Q


बीड, 29 जून (हिं.स.)।

श्री माऊली महाराज समाधी मंदिर, श्रीक्षेत्र चाकरवाडी, ता. जि. बीड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमास भाजपचे नेते अक्षय मुंदडा उपस्थित होते.

यावेळी भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनास उपस्थित राहून कीर्तनाचे श्रवण केले. हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता उत्साहात संपन्न झाली.

याप्रसंगी सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली भक्तवृंद, श्री संत चरणरज सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली भक्तवृंद तसेच प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प. महादेव महाराज (तात्या) आणि सर्व आयोजक मंडळ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande