नशामुक्त युवक ही काळाची गरज : भुषण कांबळे :
सोनपेठमध्ये आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात परभणी, 29 जून (हिं.स.) : समाजातील बहुतांश गुन्हे हे अमली पदार्थ आणि विविध प्रकारच्या व्यसनांच्या प्रभावाखाली घडत असून त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक स्तरावर देशाचे म
नशामुक्त युवक ही काळाची गरज : भुषण कांबळे :


सोनपेठमध्ये आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात

परभणी, 29 जून (हिं.स.) : समाजातील बहुतांश गुन्हे हे अमली पदार्थ आणि विविध प्रकारच्या व्यसनांच्या प्रभावाखाली घडत असून त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक स्तरावर देशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नशामुक्त युवक घडविणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुषण कांबळे यांनी केले.

ते कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते होते. यावेळी प्राचार्य डॉ. शेख शकिला, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, प्रा. डॉ. गोविंद वाकणकर आणि प्रा. डॉ. संतोष रणखांब यांची प्रमुख उपस्थिती होती.सोनपेठ पोलीस ठाणे आणि महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भित्तिपत्रक स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी प्रभावी भित्तिपत्रके सादर केली.स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम पारितोषिक सानिका शास्त्री व अनुराधा मस्के यांना ३०१ रुपये, द्वितीय पारितोषिक निखिल वाघमारे यांना २०१ रुपये, तर तृतीय पारितोषिक धीरज साठे आणि सोपान जोगदंड यांना प्रत्येकी १०१ रुपये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande