टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती आज सुनावणी, हानिया या नावासाठी घेतली इंटरनेटची मदत
नाशिक, 29 जून (हिं.स.)। - येथील TCS प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. संशयितांनी पीडितेचे ''हानिया'' असे नामांतर करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहे. ५ एप्र
टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती आज सुनावणी, हानिया या नावासाठी घेतली इंटरनेटची मदत


नाशिक, 29 जून (हिं.स.)।

- येथील TCS प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. संशयितांनी पीडितेचे 'हानिया' असे नामांतर करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहे.

५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे 'हानिया' असे नामांतर करण्यासाठी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेत त्यांनी नामांतर करून तिच्या बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची 'जकात' भरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत न्यायालयात 'एसआयटी'ने पुरावे दिले आहेत. त्यामुळे मंगळवारी (दि. ३०) निदा खान प्रकरणात नायायालयात काय निर्णय घेते हे महत्त्वाचं असेल.देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार, यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगरातील' एमआयएम'चा नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख यांना निदा खानला आश्रय उपलब्ध करून दिल्याने शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहसंशयित आरोपी केले आहे.

दरम्यान या प्रकरणी आता आज मंगळवारी (दि. ३०) पुन्हा आदेशासाठीची सुनावणी आहे. त्यांना जामीन मिळणार की फेटाळण्यात येणार याकडे राजकीय, सामाजिक वर्तुळाचेही लक्ष आहे. याप्रकरणात यापूर्वी तब्बल पंधराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande