छ. संभाजीनगर येथे शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे एल्गार आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.)। सरकारने पंढरपूरच्या पवित्र भूमीत येऊन अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्याचा शब्द दिला होता. परंतु या सरकारने शेतकऱ्यांबरोबर विश्वासघात केला. याच विश्वासघाताचा जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना विना
Q


छत्रपती संभाजीनगर, 29 जून (हिं.स.)। सरकारने पंढरपूरच्या पवित्र भूमीत येऊन अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्याचा शब्द दिला होता. परंतु या सरकारने शेतकऱ्यांबरोबर विश्वासघात केला. याच विश्वासघाताचा जाब विचारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलन केले होते.

या आंदोलनाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आजच्या आंदोलनाला असलेली हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा या सरकारवरील वाढता रोष पाहून सरकारने पुन्हा एकदा चर्चेचा शब्द दिला आहे. उद्या आमदार रोहित पवार आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे.सरकारने एकदा शब्द देऊन तो न पाळता शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निदान या वेळेस तरी सरकारने शेतकऱ्यांबाबत संवेदनशील भूमिका घेऊन दिलेला शब्द पाळावा व चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी, अन्यथा यापुढे शेतकऱ्यांचा रोष सरकारला परवडणार नाही.

सरकारने हे लक्षात ठेवावं की हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांचा हा लढा कायम राहील. आणि शेतकऱ्यांच्या या लढ्यात आमदार रोहित पवार आणि आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande