
नांदेड, 29 जून (हिं.स.)।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भोकर विधानसभा मतदारसंघातील BLA-2 प्रशिक्षण वर्ग आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, बारड संपन्न झाला. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती
यावेळी BLA-2 पदाधिकाऱ्यांना मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR), बूथस्तरीय नियोजन, संघटन बळकटीकरण तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास भोकर, मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, BLA-1, BLA-2 तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis